कृषी बातमी महाराष्ट्र राजकारण

दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार

Newslive मराठी –   राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकयांच्या मोफत मोबाइल रिचार्जच्या वृत्ताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खंडन केलं आहे. ‘ही निव्वळ एक अफवा असून काही समाजकंटकांनी केलेली पीडित शेतक-यांची क्रूर चेष्टा आहे, असे पवार यांनी म्हटलं आहे. दुष्काळग्रस्त शेतक-यांचा मोबाइल शरद पवार यांच्या तर्फ मोफत रिचार्ज करून दिला जाईल, असा संदेश सोशल मीडियावर सध्या फिरत […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

पवारांचा फोटो, चिन्ह गायब, दिशा बदलली काय?

Newslive मराठी – उस्मानाबाद, लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे 2017 च्या खरीप हंगामातील सोयाबीन पीक विम्याचे 56 कोटी मंजूर झाले.याचे पोस्टर लागले. पण यावर फक्त माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील आणि राणाजगजितसिंह यांचेच फोटो झळकले. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचं चिन्ह कुठंच दिसलं नाही. यामुळे वाऱ्याची दिशा बदलली काय? अशी […]

बातमी महाराष्ट्र राजकारण

‘आप्पा, तुमचाच वारसा चालवतोय’

Newslive मराठी- लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृतीदिन आहे. यानिमित्त त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी एक भावूक फेसबुक पोस्ट लिहिली आहे. आप्पा.. तुमचाच वारसा चालवतो आहे. संघर्षाचा, जन सामान्यांच्या कल्याणासाठी.. ! असं म्हणत त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणी जाग्या केल्या आहेत. बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

महाराष्ट्र राजकारण

शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून घेणार शपथ

Newslive मराठी- येत्या 30 तारखेला नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतून शपथ घेणार असल्याची माहिती कल्याणचे नवनिर्वाचित खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. निवडून आल्यानंतर त्यांनी प्रथमच डोंबिवलीत मतदारांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, सोशल मीडियावर #मराठीतशपथ हा ट्रेण्ड सुरू आहे. शिवसेना ही मराठी अस्मितेवर […]

महाराष्ट्र राजकारण लक्षवेधी

राज्यातील सर्वच खासदार कोट्यधीश!

Newslive मराठी-  महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेले सर्व 48 खासदार करोडपती असून त्यांची सरासरी मालमत्ता रुपये 23.04 कोटी आहे. 48 खासदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 खासदारांकडे सर्वाधिक सरासरी 89.41 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. भाजपच्या 23 खासदारांकडे सरासरी 21.11 कोटींची मालमत्ता आहे. शिवसेनेच्या 18 खासदारांकडे सरासरी मालमत्ता 12.97 कोटी आहे. काँग्रेसच्या बाळू धानोरकरांकडे 13.74 कोटींची संपत्ती आहे. दरम्यान,  […]

महाराष्ट्र राजकारण

आदित्य ठाकरे विधानसभा लढवणार ?

Newslive मराठी- युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये ‘हीच वेळ आहे..हीच संधी आहे. लक्ष्य – विधानसभा 2019 !! महाराष्ट्र वाट पाहतोय’, असं लिहिलं आहे. सोबतच आदित्य ठाकरेंचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच त्यांनी ही पोस्ट आदित्य ठाकरेंना टॅग केली आहे. त्यामुळे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार […]

बातमी बारामती महाराष्ट्र राजकारण

एक्झिट पोलवर कांचन कुल म्हणतात

Newslive मराठी-   लोकसभा निवडणूकीचा एक्झिट पोल जाहीर झाला आहे. यावर बारामती लोकसभा मतदार संघाच्या भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांनी मत व्यक्त केले आहे. एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षा आम्ही कार्यकर्त्यांच्या प्रतिसादावर विश्वास ठेवतो. त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. तसेच हा विजय सर्व जनतेचा असणार आहे. असं त्या म्हणाल्या. पंतप्रधानपदी मराठी माणूस? बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक […]

आंतरराष्ट्रीय राजकारण

पंतप्रधानपदी मराठी माणूस?

Newslive मराठी-   सध्या राजकीय घडामोडींमध्ये मराठी माणसाला सुखावणारी बातमी आहे. तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी दुसऱ्यांदा राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने त्रिशंकू झाल्यास दिल्लीच्या तख्तावर शरद पवार यांची वर्णी लागण्याची चर्चा आहे. तिकडे एनडीएला जर 200 पेक्षा जास्त जागा मिळाल्या नाही तर घटक पक्ष नितीन गडकरीचे नाव पुढे करतील. देशात […]

महाराष्ट्र राजकारण

चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना खुलं आव्हान

Newslive मराठी –   महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना खुलं आव्हान दिलं. ते सोलापुरातल्या मोहोळ तालुक्यात दुष्काळ दौऱ्यात बोलत होते. सरकारनं दुष्काळासंदर्भात केलेल्या कामांसंबंधीची आकडेवारी मी सर्वांसमोर मांडतो. त्यासाठी कोणीही चौकात चर्चा करायला बोलवलं तरी मी तयार आहे. मग ते जाणता राजा असो किंवा कोणीही, असं पाटलांनी म्हटलं. तसंच, दुष्काळाचा फायदा […]

आंतरराष्ट्रीय राजकारण

‘माजी पंतप्रधान राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर-वन’

Newslive मराठी –   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी माजी पंतप्रधान व दिवंगत नेते राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका केली.  उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील प्रचारादरम्यान मोदी बोलत होते. ‘मिस्टर क्लीन’ असा कार्यकाळ ठेवणाऱ्या तुमच्या वडिलांचा शेवट ‘भ्रष्टाचारी नंबर-वन’च्या रूपात झाला, असे मोदी म्हणाले. नामदार हा अहंकार तुम्हाला संपवून टाकेल. […]