आंतरराष्ट्रीय बातमी लक्षवेधी

आता येणार ‘एक देश एक रेशनकार्ड’

Newslive मराठी- आता ‘एक देश एक रेशनकार्ड’, या नव्या योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे काम सुरू आहे. अशी माहिती केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिली.

त्यांनी सर्व राज्यांच्या खाद्य सचिवांच्या बैठकीवेळी या योजनेवर भाष्य केलं. यामुळे रेशनकार्डधारकांना देशभरातील कोणत्याही रेशनिंग दुकानातून अन्नधान्याची खरेदी करता येईल. याचा फायदा देशभरात सतत प्रवास करणाऱ्या लोकांना होईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, देशभरात रेशनकार्ड्सची पोर्टेबिलिटी सुरू करण्यात येणार असल्याचं पासवान यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *