कृषी बातमी महाराष्ट्र राजकारण

दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार

Newslive मराठी    राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकयांच्या मोफत मोबाइल रिचार्जच्या वृत्ताचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खंडन केलं आहे.

‘ही निव्वळ एक अफवा असून काही समाजकंटकांनी केलेली पीडित शेतक-यांची क्रूर चेष्टा आहे, असे पवार यांनी म्हटलं आहे. दुष्काळग्रस्त शेतक-यांचा मोबाइल शरद पवार यांच्या तर्फ मोफत रिचार्ज करून दिला जाईल, असा संदेश सोशल मीडियावर सध्या फिरत आहे. या संदेशावरून संभ्रम निर्माण झाल्याने पवार यांनी स्वत: ट्विट करून त्याविषयी खुलासा केला आहे.

‘हा संतापजनक प्रकार आहे. काही समाजकंटकांकडून पीडित शेतक-यांची केलेली ही क्रूर चेष्टा आहे. अशा अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये. सायबर यंत्रणेने तत्काळ तपास करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असं आवाहनही पवार यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

पवारांचा फोटो, चिन्ह गायब, दिशा बदलली काय?

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi

One Reply to “दुष्काळग्रस्त शेतक-यांना फ्री रिचार्ज ही अफवा- शरद पवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *