कोरोनामहाराष्ट्र

महाराष्ट्रात आज ११,०८८ नव्या करोनाबाधितांची नोंद; १० हजारांपेक्षा अधिक रुग्णांना डिस्चार्ज

Newsliveमराठी – जगभरात आणि देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आज राज्यात ११ हजार ०८८ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यानंतर राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ५ लाख ३५ हजार ६०१ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १० हजार ०१४ रूग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.

आज राज्यात ११ हजार ०८८ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, राज्यात सध्या १ लाख ४८ हजार ५५३ अॅक्टिव्ह केसेस आहेत. मृतांची संख्याही आता १८ हजार ३०६ वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली होती. दरम्यान, मंगळवारी १० हजार ०१४ जणांना उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत ३ लाख ६८ हजार ४३५ जण उपचारानंतर करोनामुक्त झाले आहेत. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर आता ६८.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे.

दरम्यान, दिवसभरात राज्यात २५६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. राज्यातील मृत्यूदर हा ३.४२ टक्के असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. आतापर्यंत २८ लाख ३७ हजार ५७८ नमून्यांची चाचणी करण्यात आली असून त्यापैकी ५ लाख ३५ हजार ६०१ नमूने पॉझिटिव्ह आढले आहेत.