कोरोनामहाराष्ट्र

महाराष्ट्रात ११,१११ नव्या करोनाबाधितांची नोंद; दीड लाखांपेक्षा जास्त अ‍ॅक्टिव्ह रुग्ण

Newsliveमराठी – देशात आणि राज्यात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. काल राज्यात ११ हजार १११ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दिवसभरात २८८ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. त्यानंतर राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या सहा लाखांच्या जवळ पोहोचली आहे. दरम्यान, काल उपचारानंतर तब्बल ८ हजार ८३७ रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे.

काल राज्यात ११ हजार १११ करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ५ लाख ९५ हजार ८६५ वर पोहोचली आहे. तर राज्यात सध्या १ लाख ५८ हजार ३९५ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. आतापर्यंत ४ लाख १७ हजार १२३ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत २० हजार ०३७ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दरही ७० टक्क्यांवर पोहोचला आहे.