महाराष्ट्रलक्षवेधी

सैन्य दलात बारावी उत्तीर्ण उमेदवारांना उज्ज्वल भविष्याची संधी!

भारतीय सैन्य दलात काम करण्यासाठी आणि चमकदार आयुष्य जगू इच्छिणाऱ्या बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी मिळत आहे. भारतीय सैन्य दलात टेक्निकल एन्ट्री स्कीम अंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. केवळ फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स विषय घेऊन बारावी उत्तीर्ण झालेले उमेदवार अर्ज करू शकतील.

प्रशिक्षण जानेवारी २०२१ पासून सुरू होणार आहे. यासाठी पदांची संख्या 90 आहे. 2 जुलै 2001 ते 1 जुलै 2004 या कालावधीत जन्म झालेले पुरुष उमेदवार अर्ज करू शकतील. यामुळे ही मोठी संधी चालून आली आहे.

बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिकस् विषयांचे मिळून सरासरी किमान 70 टक्के गुण अनिवार्य आहे. महत्त्वाची बाब म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 सप्टेंबर 2020 आहे. www.joinindianarmy.nic.in या वेबसाईटवर तुम्ही अर्ज भरू शकता. दरम्यान, टेक्निकल ट्रेनिंगसाठी निवड झालेल्या उमेदवारांना पाच वर्षांचे प्रशिक्षण दिले जाते.

यापैकी 1 वर्ष बेसिक मिलिटरी ट्रेनिंग तर चार वर्षे टेक्निकल ट्रेनिंग दिले जाते. प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या उमेदवारांना सैन्यदलात लेफ्टनंटपदी रुजू केले जाते. यामुळे इच्छुकांनी या संधीचा फायदा करून घ्यावा.