कोरोनामहाराष्ट्र

महाराष्ट्रात १३ हजार १६५ नवे करोना रुग्ण, ३४६ मृत्यूंची नोंद

Newsliveमराठी – महाराष्ट्रात १३ हजार १६५ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ९ हजार ११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ही ६ लाख २८ हजार ६४२ इतकी झाली आहे. यापैकी ४ लाख ४६ हजार ८८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७१. ९ टक्के झाला आहे. तर मागील २४ तासांमध्ये ३४६ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मृत्यू दर ३.३५ टक्के इतका झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

सध्याच्या घडीला राज्यात ११ लाख ६२ हजार ४५० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत. तर ३७ हजार ९४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. आजवर पाठवण्यात आलेल्या ३३ लाख ३७ हजार ८४८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६ लाख २८ हजार ६४२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्याच्या घडीला १ लाख ६० हजार ४१३ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.