कोरोनामहाराष्ट्र

महाराष्ट्रात दिवसभरात १४,४९२ रुग्ण

Newsliveमराठी – महाराष्ट्र राज्यात करोना रुग्णवाढीचा नवा उच्चांक काल नोंदविण्यात आला. गेल्या २४ तासांत १४,४९२ नवे रुग्ण आढळले. दिवसभरात राज्यात ३२६ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात बुधवारी १३ हजारांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली होती. गुरुवारी १४,४९२ म्हणजे आतापर्यंतचे २४ तासांतील सर्वाधिक रुग्ण आढळले. राज्यातील करोनाबाधितांची एकू ण संख्या ६ लाख ४३ हजार झाली असून, १ लाख ६२ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. दिवसभरात मुंबई १,२७५, नागपूर ९२४, नवी मुंबई ४९२, नाशिक शहर ७४५, पुणे शहर १६८२, पिंपरी-चिंचवड १०००, जळगाव ५१५, उस्मनाबाद २६४, कोल्हापूर जिल्हा ५५० रुग्ण आढळले.सण उत्सवाच्या तोंडावर राज्यातील करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने सरकारी यंत्रणाही सावध झाल्या आहेत. गर्दी टाळण्याचे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे.