महाराष्ट्रलक्षवेधी

हैदराबादमधील 1650 एकर जंगल अभिनेता प्रभासने घेतले दत्तक

बाहुबली चित्रपटानंतर प्रत्येकाच्या पसंतीस आलेला बाहुबली स्टार प्रभासने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. आता तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. नुकतेच त्याने हैदराबाद जवळील काझिपल्ली आरक्षित वनातील 1650 एकर क्षेत्र दत्तक घेतले असून त्याचा विकास करण्याची जबाबदारी त्याने उचलली आहे. प्रभासने आपल्या इंस्टाग्राम पोस्टवरून एका व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे. यामुळे त्याचे कौतुक केले जात आहे.

प्रभास म्हणाला मी हैदराबादजवळील काझीपल्ली राखीवक वनक्षेत्रातील 1650 एकर क्षेत्र दत्तक घेऊन त्याचा विकास करण्याची जबाबदारी घेतली आहे.

महाराष्ट्रात देखील सयाजी शिंदे यांनी असे उपक्रम राबविले आहेत. त्यांनी देखील अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून झाडे लावली आहेत. तसेच अनेक झाडांची निगा राखण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन मदत देखील केली आहे. आता हा उपक्रम प्रभासने हाती घेतला आहे त्यामुळे त्याचे देखील कौतुक केले जात आहे.