आंतरराष्ट्रीय बातमी मनोरंजन

‘मर्दानी 2’ मधील राणीचा दमदार लुक

Newslive मराठी – अभिनेत्री राणी मुखर्जीचा ‘मर्दानी’ या चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘मर्दानी 2’ मधील राणीचा पहिला लुक समोर आला आहे. यात राणी महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दिग्दर्शक गोपी पुथरन ‘मर्दानी 2’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. राणीचा पती आदित्य चोप्रा या सीक्वलचा निर्माता असणार आहे. दरम्यान, हा चित्रपट 2019च्या […]

बातमी लक्षवेधी

वाचा कसा सुरू झाला कामगार दिन

Newslive मराठी – औद्यागिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळाला. पण त्यांची पिळवणूक सुरू झाली. त्यांना काहीच सुविधा न देता 12-14 तास राबवून घेतले. याविरोधात कामगार एकत्र आले. त्यांनी संघटनेची निर्मिती केली. प्रत्येकाला केवळ 8 तास काम असावे, हा ठराव केला. पण उद्योजक न जुमानल्याने आंदोलने उभारली. यानंतर संघटनेची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली आणि 1891 पासून […]

आंतरराष्ट्रीय राजकारण

सपना भाजपमध्ये जाणार

Newslive मराठी- हरियाणाची डान्सर सपना चौधरी गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये जाणार कि भाजपमध्ये जाणार या चर्चांना उत आला आहे. मात्र दिल्ली भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारींनी या चर्चांना आता पूर्णविराम दिला आहे. ‘सपना ही भाजपमध्येच प्रवेश करणार आहे. हे निश्चित झाले आहे’, असे तिवारींनी सांगितले आहे. पण तिला लोकसभेचे तिकिट मिळणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले […]

आंतरराष्ट्रीय लक्षवेधी

नाकातून रक्त येऊ नये म्हणून उन्हात जाण्यापूर्वी ‘हे’ करा

Newslive मराठी –   नाकातून रक्त येऊ नये म्हणून या खालील गोष्टी करा. थोडा ओलसर केलेला रुमाल बाहेर जाताना नाकावर बांधा. थेट गरम हवा नाकात जाणार नाही. – नाकात मारण्यासाठीचा सलाईनचा स्प्रे औषध दुकानात मिळतो. उन्हातला लांबचा प्रवास करताना काही अंतर गेल्यानंतर नाकात स्प्रे मारला तर ओलसरपणा टिकून राहतो आणि त्यातून रक्त येणे टाळता येते. […]

महाराष्ट्र राजकारण

मतदानादिवशी प्रचार करणारा कुत्रा ताब्यात

Newslive मराठी-  लोकसभेचे शेवटच्या टप्प्यातील मतदान नंदूरबारमध्येही पार पडले. यावेळी चक्क कुत्र्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. हे कुत्रे चक्क मतदानादिवशी भाजपचा प्रचार करत होते. त्याच्या शरीरावर भाजपाचे निवडणूक चिन्ह आणि ‘मोदी लाओ, देश बचाओ’ अशा संदेशाचे स्टीकर्स चिकटवलेले होते. यामुळे कुत्र्यासह मालक एकनाथ चौधरीला (65) पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, चौधरीवर आयपीसी कलम 171 (अ) अंतर्गत तक्रार […]

बातमी महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे आमदार हनुमंत डोळस यांचे निधन

Newslive मराठी- राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभेचे विद्यमान आमदार हनुमंतराव डोळस यांचं निधन झालं आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर मुंबईतील सैफी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मावळली.  ते 57 वर्षांचे होते. पहिल्यांदा 2009 मध्ये विधानसभेवर निवडून गेले होते आणि 2014 मध्येही राष्ट्रवादीकडून ते आमदार म्हणून निवडून आले होते.

आरोग्य बातमी लक्षवेधी

अंडी खाण्याचे आहेत अनेक फायदे

Newslive मराठी- अंडी खाण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे हृदयविकारापासून बचाव होतो. – अंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, कार्बोहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-6, बी12, मिळते. – अंड्यातील बलक हा डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त आहे. – तजेलदार त्वचा, शरीराची वाढ, चेतापेशींना संरक्षण मिळण्यासोबतच सौंदर्य राखण्यासाठीही मदत होते. – आम्लपित्ताचा त्राससुद्धा अंडे खाल्ल्याने कमी होतो.  

आंतरराष्ट्रीय मनोरंजन

अॅव्हेंजर्स एंडगेम’ ने कमवले 186.53 कोटी

  Newslive मराठी-  मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा चित्रपट ‘अॅव्हेंजर्स एंडगेम’ने भारतात पहिल्या वीकेंडमध्ये 186.53 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाची जगात मोठी चर्चा सुरु आहे. हा चित्रपट कमाईचे सर्व विक्रम मोडेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, चित्रपटाचे दमदार प्रमोशनही केले जात आहे. आतापर्यंत जगभरात या चित्रपटाने 8,379 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अनुष्का, […]

कृषी महाराष्ट्र

पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी झाली

Newslive मराठी-  रविवारी गुलटेकडी येथील मार्केटयार्डात पाणीटंचाईमुळे भाजीपाल्याची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेत घटली आहे. गुलटेकडी येथील मार्केटयार्डात भाजीपाल्याची 150 ट्रक आवक झाली. आवक कमी झाल्याने भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. येत्या काही दिवसांत अतिउष्ण तापमानामुळे पालेभाज्यांची आवक आणखी कमी होईल, असे येथील व्यापा-यांनी सांगितले.

महाराष्ट्र राजकारण

दीड तास रांगेत उभे राहून राज ठाकरेंनी केले मतदान

Newslive मराठी- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुमारे दीड तास रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला. दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान राज ठाकरे आपल्या कुटुंबासह दादर येथील बालमोहन शाळेत मतदानासाठी आले होते. तेथे मोठी रांग होती.  सर्वसामान्य मतदाराप्रमाणेच राजही मतदानासाठी रांगेत उभे राहिले. दरम्यान, मुंबईत आज सेलिब्रिटी, कार्पोरेट जगतातील मतदारासह सर्वसामान्य मतदार रांगेत उभे राहून मतदानाचा […]