बारामती महाराष्ट्र

बारामती पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची तयारी

Newslive मराठी- (बारामती प्रतिनिधीः रणजीत कांबळे) बारामती शहरातील भिगवण रोडवरील सराफ होंडा शोरुमच्या पाठीमागे दि.13 फेब्रुवारी रोजी झालेल्या वृक्षतोडसंदर्भात जळोची तलाठी यांनी पंचनामा करत रिपोर्ट तहसिलदार यांकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे. पंचनाम्यात 30 ते 40 वृक्षांची विना परवाना तोड केल्याचे नमुद करण्यात आले आहे. दरम्यान, बारामती आरपीआय शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, शहर सचिव सम्राट गायकवाड आणि […]

महाराष्ट्र लक्षवेधी

दोन पोते कंडोम जप्त

Newslive मराठी-  औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव (कोल्हाटी) येथील कुंटणखान्यावर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात तब्बल दोन पोते कंडोम जप्त करण्यात आले आहेत. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या महिला, 6 वारांगणा आणि तीन ग्राहकांना ताब्यात घेतले आहे. यावेळी रोख रक्कमही जप्त करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी कुंटणखाना सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली […]

बारामती महाराष्ट्र

बारामतीत दिव्यांग कल्याणकारी योजनेतंर्गत लाभार्थीना धनादेशाचे वाटप

Newslive मराठी- बारामती नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने दिव्यांग कल्याणकारी योजना अंतर्गत विद्यार्थी व नागरिक अशा लाभार्थीना धनादेशाचे वाटप करण्यात आले. हा धनादेश वाटपाचा कार्यक्रम बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते बारामती येथे पार पडला. यावेळी 114 लाभार्थी नागरिकांना एकूण 13 लाख 30 हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. किरकटवाडी येथील […]

बातमी महाराष्ट्र

किरकटवाडी येथील शाळेच्या वर्गखोल्यांचे उद्घाटन संपन्न

Newslive मराठी- हवेली तालुक्यातील किरकटवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन आज (रविवारी) करण्यात आले. हा उद्घाटन सोहळा खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सुळे यांनी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या विद्यार्थी, महिला आणि नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला विविध मान्यवर आणि गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री होण्यात मला फारसे स्वारस्य […]

इंदापूर महाराष्ट्र

बाबीर देवस्थान येथे भक्त निवास बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन संपन्न

Newslive मराठी-  इंदापूर तालुक्यातील रुई येथील बाबीर देवस्थान येथे आज (रविवारी) भक्त निवास बांधण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामाचे भूमिपूजन पुणे जिल्हा परिषद आरोग्य आणि बांधकाम विभागाचे माजी सभापती प्रवीण माने यांनी केले. या कामासाठी पुणे जिल्हा परिषद यांच्या वतीने 19 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. रुई येथील बाबीर देवाचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या […]

इंदापूर महाराष्ट्र

अंकिता पाटील यांनी दिली पिंपरी खुर्द गावाला भेट

Newslive मराठी-इंदापूर तालुक्यातील पिंपरी खुर्द या गावाला आज (रविवारी) पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी भेट दिली. या भेटीत त्यांनी गावातील नवीन रस्ते आणि इतर विकासकामांविषयी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, पत्रकार व गावकऱ्यांशी चर्चा केली. दरम्यान, गावातील विकासकामे तात्काळ मंजूर करावे, यासाठी गावकऱ्यांच्या वतीने पाटील यांना यावेळी निवेदन देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अमोल कोल्हे […]

बातमी महाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह अमोल कोल्हे यांनी घेतली बैठक

Newslive मराठी- पुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बैठक घेतली. ही बैठक जिल्हा परिषद पुणे येथे पार पडली. यावेळी विविध विभागांचा आढावा घेण्यात आला. त्यात प्रामुख्याने शिक्षकांचे प्रश्न, आरोग्य विभागातील अडचणी, पाणीपुरवठा विभागाचे नवीन योजना राबविणे, यापूर्वीच्या मंजूर विकासकामे लवकरात लवकर पूर्ण व्हावीत, यासाठी सूचना देण्यात आल्या. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला […]

बारामती महाराष्ट्र

बारामती शहरात मोठ्या प्रमाणावर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर वृक्षतोड; कारवाईची मागणी

Newslive मराठी-  (बारामती प्रतिनिधीः रणजीत कांबळे) बारामती शहरातील भिगवण रोडवरील सराफ होंडा शोरुमच्या पाठीमागे आज 13 फेब्रुवारी रोजी (गुरुवारी) मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. विशेष म्हणजे ही वृक्षतोड नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली आहे. सदर वृक्षतोड ही नियमबाह्य आणि बेकायदेशीरपणे सुमारे 60 ते 70 लिंबाच्या झाडांची कत्तल पालिकेकडून करण्यात आली आहे. सदर वृक्षतोडी […]

बातमी महाराष्ट्र

साधना विद्यालयात वॉटर बेल या उपक्रमाचा शुभारंभ

Newslive मराठी-  हडपसर परिसरातील रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय सोमवारी वॉटर बेल या उपक्रमाचा शुभारंभ केला. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी नियमितपणे पाणी प्यावे या दृष्टिकोनातून शालेय तासिकांव्यतिरिक्त दिवसभरातून दोनदा वॉटर बेल दिली जाते. विद्यार्थ्यांना दोन मिनिटांचा विश्रांती दिली जाते. यादरम्यान सर्व विद्यार्थी आपल्या दप्तरातील पाण्याची बाटली काढून एकाच वेळी […]

बातमी महाराष्ट्र

नागरिकांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात सिद्धार्थ शिरोळे यांनी घेतली बैठक

Newslive मराठी-  पुणे शहरात सध्या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे शहरातील कामगार पुतळा वसाहत येथील नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सोमवारी कामगार पुतळा येथील रहिवाशांसोबत बैठक घेतली. तसेच  यासंदर्भात मी लवकरच पुण्याचे खासदार गिरिश बापट, मेट्रोचे अधिकारी, महानगर पालिकेचे अधिकारी व स्थानिक नागरिक यांची बैठक आयोजीत करून हा प्रश्न […]