महाराष्ट्र राजकारण

सात शिवसैनिकांचा मनसेत प्रवेश; राज ठाकरेंचा शिवसेनेला धक्का

कोरोना काळात सुद्धा राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. औरंगाबादमध्ये मनसेने शिवसेनेला धक्का दिला आहे. औरंगाबादमधील सात निष्ठावंत शिवसेनैकांनी मनसेत प्रवेश केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात हा पक्षप्रवेश पार पडला. मनसेकडून ट्विट करत यासंबंधी माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या असल्या तरी औरंगाबाद पालिका निवडणुकीत शिवसेनेला याचा फटका […]

महाराष्ट्र शैक्षणिक

अंतिम वर्षाच्या परीक्षा घरामधूनच देता याव्यात यासाठी प्रयत्न सुरू- उदय सामंत

अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडून त्यादृष्टीने तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना काळात विद्यार्थ्यांना कमी त्रास देऊन घरातल्या घरात परीक्षा देता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा कधी व कशा घेतल्या जाव्यात या अनुषंगाने […]

कोरोना महाराष्ट्र

राज्य सरकारची नियमावली जाहीर; ई-पास रद्द, हॉटेल सुरू, शाळा बंदच

राज्य सरकारकडून अनलॉक 4 च्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यालयाच्या सूचनेनंतर राज्य सरकारने जनतेला मोठा दिलासा दिला आहे. येत्या 1 सप्टेंबरपासून अनलॉकचा चौथा टप्पा सुरु होणार आहे. राज्य सरकारकडून ई-पासची अट रद्द करण्यात आली आहे. मात्र शाळा-कॉलेज हे अद्याप बंद राहणार आहेत. येत्या 1 सप्टेंबरपासून मुंबईतील विमानसेवेतील उड्डाणांची संख्या दुप्पट केली आहे. तसेच […]

महाराष्ट्र राजकारण

माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचे निधन 

देशाचे माजी राष्ट्रपती ‘भारतरत्न’ प्रणव मुखर्जी यांचं निधन झालं आहे. ते 84 वर्षाचे होते. कोरोनामुळं त्यांना 10 ऑगस्ट रोजी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याबाबत त्यांनी स्वतः ट्विट करून सांगितलं होतं आणि संपर्कात आलेल्यांना टेस्ट करून घेवून आयसोलेट होण्याबाबत देखील त्यांनी आवाहन केलं होतं. 10 ऑगस्टला त्यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. […]

महाराष्ट्र शैक्षणिक

विद्यापीठात ऑनलाईन परीक्षा अशक्य, कुलगुरू समितीच्या बैठकीत निरीक्षण

राज्यातील प्रत्येक विद्यापीठांमध्ये कशाप्रकारे परीक्षा घ्यायच्या, याविषयी अजूनही पेचप्रसंग कायम आहे. राज्यभरातील विद्यापीठांचा आणि त्यात आयोजित केला जाणाऱ्या परीक्षांचा कुलगुरु समितीच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. कुलगुरुंनी दिलेला अहवाल उद्या सरकारकडे ठेवला जाणार आहे. ग्रामीण भागातील विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेणे कठीणच असल्याची व्यथा यावेळी कुलगुरुंनी मांडली. ऑफलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात सरकारला धोरणात्मक निर्णय घ्यावा लागेल, त्यासाठी पुन्हा […]

महाराष्ट्र लक्षवेधी

बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते- कंगणा रनौत

वाईट प्रवृत्तींविरोधात बोलत असल्यामुळे माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मला संरक्षणाची गरज आहे. हे संरक्षण हिमाचल प्रदेश पोलिसांनी द्यावे अथवा केंद्रीय पोलिसांनी द्यावे, असे अभिनेत्री कंगना रनौत ट्विटरवर म्हणाली आहे. भाजप नेते राम कदम यांनी मुंबई पोलिसांनी कंगनाला संरक्षण द्यावे अशी मागणी करणारे ट्वीट देखील केले होते. ट्वीटला रिप्लाय करत कंगनाने पोलीस संरक्षण हवे […]

महाराष्ट्र राजकारण

मोदी सरकार तुम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करत आहे- राहुल गांधी

मोदी सरकारच्या धोरणांवर सातत्यानं टीका करणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी ‘अर्थव्यवस्था की बात’ व्हिडीओ मालिकेच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य करणार आहे. राहुल गांधी यांनी पहिला व्हिडीओ ट्विट केला असून, देशातील असंघटित क्षेत्र उद्ध्वस्त करण्याचा मोदी सरकारचा असल्याचा आरोप केला आहे. “नोटबंदी, जीएसटी व लॉकडाउन हे ती चुकीचे निर्णय मोदी सरकारनं घेतले. या तिन्हींचा उद्देश असंघटित […]

आरोग्य महाराष्ट्र

दिवाळीपर्यंत कोरोना नियंत्रणात येईल; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची माहिती

भारतात कोरोनाने चांगलेच थैमान घातले आहे. जवळपास ३५ लाखांचा आकडा रुग्णसंख्येने पार केला आहे. संपूर्ण जगात या लस संदर्भातसंशोधन सुरु आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रभाव कमी होण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ते म्हणाले, ‘ दिवळीपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाला मोठं यश मिळेल, कोरोनाचं संक्रमण पुढच्या काही महिन्यात नियंत्रणात […]

देश-विदेश महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाने प्रशांत भूषण यांना दिली एक रूपयाची दंडाची शिक्षा

प्रशांत भूषण यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानना खटल्याच्या शिक्षेकडे संपूर्ण देशाचेच लक्ष लागले होते. अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल आज जाहीर केला. मागील सुनावणीच्या वेळी प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला होता. प्रशांत भूषण यांना शिक्षा देऊ नये, अशी विनंती अटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी मागील सुनावणीत न्यायालयाला केली होती. आज […]

कृषी महाराष्ट्र

फुलशेतीतून दोन महिन्यांत दोन लाखांचे उत्पन्न, झेंडूने बहरले आयुष्य

दुष्काळामुळे मराठवाड्यातील शेतीव्यवसायात कायम तोट्यात असल्याने पाऊस आला तरी नुकसान आणि नाही आला तरी नुकसानच असे चित्र असताना भेंड खुर्द (ता. गेवराई) एका शेतकऱ्याने पारंपारिक पिकाला फाट देत हा चित्र बदला आहे. भेंड खुर्द येथील अशोक शिंदे यांनी झेंडूचे पीक घेतले. यातून अवघ्या दोन महिन्यांत त्यांनी दोन लांखाचे उत्पन्न घेतले. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात मजुरांचा आधार […]