महाराष्ट्र राजकारण

फडणवीस साहेब काळजी घ्या, आणि कोरोनावर मात करा- रोहित पवार

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मिडीयाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली असून, मी स्वतःला वेगळे करून घेतले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार घेत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी लवकर बरे व्हावे अशा मनोकामना राजकीय नेते व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार रोहित […]

महाराष्ट्र राजकारण

चंद्रकांतदादा, तुम्ही कुल्फी किंवा चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आला आहात- एकनाथ खडसे

एकनाथ खडसेंच्या समाधानासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना लिमलेटची गोळी देणार की कॅडबरी? हे पाहावे लागेल. असे म्हणत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंवर निशाणा साधला. याला उत्तर देताना एकनाथ खडसेंनी चंद्रकांतदादा तुमचा भाजपाशी संबंध काय होता? तुम्ही तर कुल्फी आणि चॉकलेट मिळावं म्हणून भाजपामध्ये आला आहात, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. राष्ट्रवादी […]

बातमी महाराष्ट्र

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसह बेघर झालेल्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या

Newslive मराठी- फलटण, दि. 22 (रणजीत कांबळे) गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्ह्यासह संपुर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसामुळे अतिवृष्टी झाली आहे. या अतिवृष्टीच्या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचा हाता तोंडाशी आलेला घास या अतिवृष्टीच्या पावसाने वाया गेले आहे. तसेच जिल्ह्यातील अनेकांची घरे वाहून गेली, तर काहींची घरे पडली आहे. यामुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली […]

इंदापूर बातमी

इंदापूर येथे कृष्णाई सोशल फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

Newslive मराठी-  इंदापूर येथे कृष्णाई सोशल फाउंडेशनच्या वतीने भूमीपूजनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ते काल पार पडले. यावेळी 567 लोकांनी रक्तगट तपासणी करून घेतली तर अनेकांनी रक्तदान केलं. देशासह राज्यात कोरोनाचा फ़ैलाव सुरू आहे. अशातच रक्ताचा तुटवडा देखील मोठ्या प्रमाणावर भासत आहे. यामुळे ब्लड बँकांनी ऐच्छिक रक्तदान शिबिर आयोजित करावीत, अस आवाहन […]

महाराष्ट्र राजकारण

मी आणि कुटुंब असे म्हणत मुख्यमंत्री घरातच बसले आहेत- रावसाहेब दानवे

कोरोना महामारीच्या तसेच अतिवृष्टीच्या काळात राज्यकर्त्यांनी दौरे करून जनतेला दिलासा द्यायला हव आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘मी आणि माझे कुटुंब’ असे म्हणत घरातच बसले आहेत. त्यामुळे राज्य चालवणे हे ‘येड्या गबाळ्याचे’ काम नव्हे अशा शब्दांत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील आघाडी सरकारसह मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शनिवारी पैठण येथे विविध विकास […]

कृषी महाराष्ट्र

राज्यात उद्यापासून पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

या आठवड्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये हाहाःकार माजवला होता. शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. बळीराजा संकटात असतानाही आतापर्यंत कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आली नाही. अशात आता आणखी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. उद्या सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात मागील आठवड्यासारखा कमी दाबाचा पट्टा तयार होत […]

महाराष्ट्र राजकारण

१९ ऑक्टोबरपासून देवेंद्र फडणवीस अतिवृष्टी भागांचा दौरा करणार

राज्यातील मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात परतीच्या पावसाने, अतिवृष्टीने रातोरात नुकसान झाले आहे. बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. या शेतकर्‍याला दिलासा देण्यासाठी आणि झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दि. १९ ऑक्टोबरपासून ३ दिवसांचा दौरा करणार आहेत. सध्या बिहारमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फडणवीस हे बिहारच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या निवडणूक […]

मनोरंजन महाराष्ट्र

कंगना रणौतविरोधात एफआयआर दाखल करण्याचे मुबंई पोलिसांना आदेश

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश वांद्रे कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप कंगनावर लावण्यात आला असून त्यामुळेच तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. महोम्मद साहिल अशरफ अली सय्यद नावाच्या एका व्यक्तीने कंगना विरोधात मुंबई वांद्रे कोर्टात गेले होते. या व्यक्तीने असा दावा केला […]

महाराष्ट्र राजकारण

अजित पवारांच्या अडचणी वाढणार?; जलसिंचन घोटाळा प्रकरणाची ईडी करणार चौकशी

विदर्भातील जलसिंचन घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आलं होते. मात्र सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) आता सिंचन घोटाळ्याची चैकशी होणार असल्याने वृत्त आहे. यामुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जलसिंचन घोटाळ्याप्रकरणी ईडीने जलसंपदा विभागाला एक नोटीस बजावली आहे. यामध्ये कोकणातील जलसिंचन प्रकल्पांची आणि २००९ पासून वाढीव प्रकल्प […]

महाराष्ट्र राजकारण

सरकार फक्त आपल्या काही खास मित्रांचे खिसे भरण्यात व्यस्त आहे- राहुल गांधी

जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत ९४ व्या स्थानी पोहोचला आहे. नुकताच यासंबंधीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. २०१९ मध्ये भारत ११७ देशांच्या यादीत १०२ व्या क्रमांकावर असणारा भारत यावेळी १०७ देशांच्या यादीत भारत ९४ व्या स्थानी आहे. जागतिक कुपोषण निर्देशांकात भारत नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडोनेशियापेक्षा मागे आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला […]