कोरोना महाराष्ट्र

प्रत्येकापर्यंत लस पोहोचायला 2024 उजाडेल- आदर पुनावाला

सध्या देशात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. कोरोना लशीची थांबलेली चाचणी सुरू झाली असली, तरी लसनिर्मितीची प्रक्रिया सोपी नाही. प्रत्येकापर्यंत लस पोहोचण्यासाठी 2024 सालची अखेर उजाडेल, असं खुद्द सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या प्रमुखांनीच स्पष्ट केलं आहे. लवकरच कोरोनाची लस बाजारात येईल या आशेला सीरमच्या आदर पुनावाला यांच्या खुलाशामुळे लगाम घालावा लागणार आहे.

फिनान्शियल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पुनावाला म्हणाले, जगाच्या लोकसंख्येचा विचार करता लसनिर्मिती करणाऱ्या फार्मा कंपन्या एवढी निर्मिती करण्याच्या क्षमतेच्या नाहीत. सिरम ही कोरोनाच्या लसनिर्मितीतली मोठी संस्था मानली जाते. AstraZeneca आणि Novavax यांच्यासह जगभरात पाच संस्था मिळून लशीचे 100 कोटी डोस निर्माण करण्यात येत आहे. यातले निम्मे डोस भारतासाठी असेल.

जगातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत लस पोहोचवायची असेल तर त्यासाठी किमान पाच वर्षं लागतील, असं आदर पुनावाला यांनी स्पष्टपणे सांगितलं. कोरोना लसीचे चे दोन डोस घ्यावे लागणार असतील तर 15 अब्ज डोस आवश्यक आहेत, असंही पुनावाला यांनी यापूर्वी सांगितलं होतं. रोटाव्हायरस, कांजिण्या आदी रोगांवरच्या लशी अशाच दोन डोस घेतल्याशिवाय उपयुक्त ठरत नाहीत. आता रशियाने निर्माण केलेल्या स्पुटनिक लशीसाठी रशियाच्या गामालेया रिसर्च इन्स्टिट्यूटशी करार करण्याचाही सीरमचा विचार आहे. या पद्धताने लसनिर्मितीच्या कामाला वेग येऊ शकतो, असं पुनावाला म्हणाले. यामुळे आता पाच वर्षे सगळ्यांना काळजी घ्यावी लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *