आरोग्यमहाराष्ट्र

पुण्यातील ‘जम्बो’ केअर मधील 25 डॉक्‍टरांचा राजीनामा

पुण्यात कोरोनाचा उद्रेक वाढतच आहे. यातच एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. जम्बो कोविड केअर हॉस्पिटलमधील सुमारे 25 डॉक्‍टरांनी शनिवारी राजीनामे दिले. मात्र, महापालिकेने शुक्रवारीच डॉक्‍टर आणि नर्सची कुमक या ठिकाणी पाठवून उपचाराची सोय केल्याने, रुग्णांबाबत हलगर्जीपणा होणार नाही हे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

जम्बो कोविड हॉस्पिटलविषयी अविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हॉस्पिटलच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली होती. पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच आता नागरिकांना धीर देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याचे आवाहन त्यांनी केले होते.

महापालिकेने 50 डॉक्‍टर्स आणि 150 वैद्यकीय मनुष्यबळ तातडीने पुरवून या हॉस्पिटलची घडी बसवण्याचा प्रयत्न केला आहे. यावर मनपा आयुक्त यांनी माहिती घेण्याचे आश्वासन दिले आहे. कालच पुण्यात शरद पवारांनी बैठका घेतल्या होत्या.