महाराष्ट्रराजकारण

भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात- बच्चू कडू

Newslive मराठी- महाराष्ट्रातील राज्य सरकार पाडण्यासाठी अनेक प्रकारचे प्रयत्न हे भाजपकडून केले जात आहेत. भाजपकडून सतत महाविकास आघाडीतील सरकारला डिवचण्याचे काम चालू आहे. यातच भाजपचे 40 आमदार आमच्या संपर्कात आहेत. असे खळबळजनक विधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे. भाजपकडून सतत महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचे प्रयत्न होत आहेत.

तसेच हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. असे वारंवार भाजपकडून बोलण्यात येत आहे. त्यामुळे सत्तेतील नेत्यांना भाजपचे हे वाक्य मोडून काढण्यासाठी एकी व भक्कम असल्याचे दाखवावे लागत आहे. मात्र यामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान बच्चू कडू यांनी भाजपातील आमदार संपर्कात असल्याच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. आता बच्चू कडू यांनी केलेले हे विधान कितपट खरं ठरणार, आणि हे 40 आमदार कोण असणार? यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे. त्याचसोबत देवेंद्र फडणवीस हे सक्षम विरोधीपक्ष नेता असल्याचे कबूल करतील, तेव्हा भाजपचे आमदार फुटतील. असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. हा दावा कितपत खरा आहे, हे येणाऱ्या काळात समजणार आहे.

भाजपकडून वेळोवेळी सांगितले जाते की हे सरकार स्वतःहून पडेल. अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. आता भाजपचेच आमदार महाविकास आघाडीच्या संपर्कात आहेत असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. यामुळे आता विरोधक भाजपची मात्र झोप उडणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-उद्धव ठाकरे मला फक्त टीव्हीवरच दिसले– राज ठाकरे

-नरेंद्र मोदी त्यांच्यात राजकीय नेतृत्वाची धमक नाही, ते धार्मिक गटाचे नेते- प्रकाश आंबेडकर

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi