कोरोनामहाराष्ट्र

कोरोनामुळे ४२ वर्षीय पत्रकाराचा पुण्यात मृत्यू  

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पुण्यातील टीव्ही ९ वृत्तवाहिनीचे रिपोर्टर पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळं बुधवारी पहाटे साडेपाच वाजता निधन झालं, ते ४२ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि आई-वडील असा परिवार आहे. पांडुरंग रायकर यांनी पत्रकारितेची सुरुवात एबीपी माझा, टीव्ही ९ आणि त्यानंतर पुण्यात कामास सुरुवात केली. मागील आठवड्यात त्यांना कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांची कोरोना चाचणी केल्यावर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

त्यानंतर त्यांना सीईओपी मैदानावरील कोविड केअर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. इथे उपचारादरम्यान त्यांची तब्येत खालावत गेली. अखेर त्यांचा आज मृत्यू झाला. अनेक विषयांना त्यांनी वाचा फोडली होती. एक प्रामाणिक, शांत पत्रकार म्हणून त्यांची ओळख होती.