Newslive मराठी- कोरोना विषाणूचा प्रसार देशात झपाट्याने वाढत आहे. करोनाचा उद्रेक झालेल्या देशांच्या यादीत भारत सध्या तिसऱ्या क्रमांकांवर आहे. मागील चोवीस तासांत देशभरात 47 हजार 704 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 654 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
याचबरोबर देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 14 लाख 83 हजार 157 वर पोहोचली आहे. देशभरातील एकूण 14 लाख 83 हजार 157 कोरोनाबाधितांमध्ये 4 लाख 96 हजार 988 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
दरम्यान, उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आलेले 9 लाख 52 हजार 744 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 33 हजार 425 जणांच्या संख्येचा समावेश आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली.