महाराष्ट्रराजकारण

एमएसएमई क्षेत्रात ५ लाख नवे रोजगार निर्माण होणार – नितीन गडकरी

Newsliveमराठी – देशात करोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तसंच करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचं चक्रही पूर्णपणे थांबलं होतं. अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर हळूहळू अर्थव्यवस्थेचं चक्रही सुरू होताना दिसत आहे. आता अर्थव्यस्थेला बळकटी देण्यासाठी सरकारनंही प्रयत्न सुरू केले आहेत. “आपल्या देशात एमएसएमई क्षेत्राचं मोठं योगदान आहे. तसंच येत्या काळात या क्षेत्रात ५ कोटी नवे रोजगार निर्माण होती अशी अशा आहे,” असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ‘स्वावलंबन ई-समिट २०२०’ मध्ये गडकरी बोलत होते.

“देशाच्या विकासात एमएसएमई क्षेत्राचं मोठं योगदान आहे. जीडीपीच्या वाढीच्या दरात ३० टक्के उत्पन्न हे एमएसएमई क्षेत्राचं आहे. आतापर्यंत या क्षेत्रात आम्ही ११ कोटी रोजगार निर्माण केले,” अशी माहिती गडकरी यांनी दिली. “माझा विश्वास आहे आणि विचार आहे की येत्या पाच वर्षांमध्ये जीडीपीच्या वाढीचा दरातील एमएसएमई क्षेत्राचं उत्पन्न ३० टक्क्यांवरून ५० टक्के करू आणि निर्यातही ४८ टक्क्यांवरून वाढवून ६० टक्के करत ५ कोटी नवे रोजगारही निर्माण करू,” असंही ते म्हणाले आहेत.