आंतरराष्ट्रीय महाराष्ट्र

नवीन वर्षात ५२ नद्यांची शुद्धीकरण मोहिम- रामदास कदम

Newslive मराठी:  नवीन वर्षात राज्यातील ५२ नद्यांचे शुद्धीकरण मोहिमेचे काम सुरु होणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितले.

अलीकडेच चंद्रभागा नदी स्वच्छ केली. या मोहिमेत जवळपास ५०० नागरिक आणि अधिकारी सहभागी झाले होते. लवकरच तेथील गाळ काढणार आहोत. चंद्रभागेत आजूबाजूच्या १२१ गावांचे सांडपाणी सोडले जाते. ते अडवणार आहोत. त्यासाठी २० कोटी रुपये दिले आहेत. नदीकाठी भक्तांसाठी स्वच्छतागृहे, आंघोळीसाठी घाट बांधणार आहोत असे कदम यावेळी म्हणाले.

कचऱ्यापासून खत निर्माण करण्यासंदर्भात, राज्यातील २२७  नगरपरिषदा आणि २७ महानगरपालिका क्षेत्रातील कचरा आणि शेण एकत्र करुन सेंद्रीय खत निर्माण करणार आहोत. हे खत शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना रासायनिक खते वापरुन उगवलेल्या धान्यापासून मुक्ती मिळेल.

दरम्यान, प्लास्टिक बंदीचा निर्णय यशस्वी झाल्यानंतर भीमा, गोदावरी, पंचगंगा, उल्हास, मीठी या व इतर जवळपास ५२ नद्यांचे शुद्धीकरण करण्याची मोहीम पर्यावरण विभागाने हाती घेतली आहे, असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *