देश-विदेशबातमी

देशात 24 तासांत आढळले 52 हजार कोरोनाबाधित

Newslive मराठी-  देशातील कोरोना वाढीचा वेग वाढत असल्याचं दररोज समोर येणाऱ्या आकडेवारीतून दिसून येत आहे. 40 हजारांपेक्षा जास्त रुग्ण दिवसाला देशात आढळून येत असून, मागील 24 तासांतही रुग्णसंख्येची उच्चांकी नोंद झाली. 24 तासात 52 हजार कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या 15 लाख 83 हजार 792 इतकी झाली आहे. त्याबरोबरच याच कालावधीत देशभरात 775 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे देशात धक्कादायक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यांमध्ये रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ असल्याचे दिसून येत आहे.लॉकडाऊन हळूहळू शिथिल करण्यात येत आहे तर, दुसरीकडे देशातील एकूण रुग्णसंख्या वाढीचा वेगही वाढला असून, 24 तासात आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.

पहिल्यांदाच 24 तासांमध्ये 50 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण देशात आढळून आले आहेत. चिंताजनक बाब म्हणजे 24 तासात आतापर्यंतचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. 24 तासांमध्ये 52 हजार 123 नवीन करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा आता 16 लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 15 लाख 83 हजार 792 इतकी झाली आहे. तर 775 रुग्णांचा 24 तासांत मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत; राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर जोरदार टीका

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

-सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला गंभीर इशारा