कोरोनादेश-विदेश

देशात २४ तासात आढळले ५७,९८२ नवे करोना रुग्ण; एकूण रुग्ण २६ लाखांच्या पार

Newsliveमराठी – जगात करोनाचा संसर्ग वेगाने वाढतच असल्याचे चित्र आहे. गेल्या चोवीस तासांत भारतभरात ५७,९८२ नवे करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या आता २६ लाखांच्या पार पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी ही आकडेवारी जाहीर केली.

सकाळी दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २६ लाख ४७ हजार ६६४ झाली आहे. यांपैकी ५० हजार ९२१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १९ लाख १९ हजार ८४३ रुग्ण बरे झाले आहेत. ६ लाख ७६ हजार ९०० अॅक्टिव रुग्ण आहेत. करोना संक्रमितांच्या संख्येच्या हिशोबानं भारत जगातील तिसरा सर्वाधिक करोना बाधित देश बनला आहे.

त्याचबरोबर आयसीएमआरच्या माहितीनुसार, देशात १६ ऑगस्टपर्यंत एकूण तीन कोटी ४१ हजार ४०० नमुन्यांची चाचणी झाली आहे. रविवारी एका दिवसात ७ लाख ३१ हजार ६९७ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आहे.