महाराष्ट्रराजकारण

आरेची ६०० एकर जागा वनासाठी कायम- उद्धव ठाकरे

मुंबईतील आरेच्या जागेवरून देवेंद्र फडणवीस यांच्या काळात बराच वाद झाला होता. आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ असणारी आरेची ६०० एकर जागा वनासाठी कायम ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे़. महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलवण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

या राखीव ठिकाणी वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय सुद्धा या बैठकीत घेण्यात आला आहे. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात प्रस्तावना केली. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी या प्रस्तावासंदर्भात पुढाकार घेतला होता.

या बैठकीला एकनाथ शिंदे तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे मुंबईत 600 एकर जंगल कायम राहील. यासाठी आंदोलने देखील करण्यात आली होती.