महाराष्ट्रराजकारण

राज्यसभेतील गोंधळामुळे काँग्रेसच्या राजीव सातवांसह 8 खासदार निलंबित

दिल्लीत सध्या शेती विधेयकावरून राजकारण तापले आहे. यामध्ये काल शेती विधेयकावरून राज्यसभेत काँग्रेसने जोरदार गोंधळ घातला होता. त्यामुळे आज राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेसच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेसचे खासदार राजीव यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. राजीव सातव यांच्यासह आठ खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे. हा गोंधळ काँग्रेस खासदारांच्या चांगलाच अंगलट आला आहे.

राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी ही कारवाई केली आहे. काँग्रेसच्या आठही खासदारांचे आगामी 7 दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनात वादग्रस्त शेती विधेयकावरून जोरदार गदारोळ पाहण्यास मिळाला. राज्यसभेत कृषी मंत्री नरेंद्र तोमर हे बोलायला उभे राहिले असता विरोधकांनी एकच गोंधळ घातला होता.

सभागृहाची वेळ वाढविण्याच्या मुद्यावरून एकच वाद पेटला होता. कृषी मंत्र्यांनी दुसऱ्या दिवशी उत्तर देण्याची विरोधी पक्ष नेते गुलाम नवी आझाद यांनी मागणी केली होती. पण, या गोंधळात कृषी मंत्री नरेंद्र तोमर देत आहे चर्चेला उत्तर देत होते. त्यावेळी झालेल्या गोंधळ उपसभापतींसमोर माईक तोडण्याचाही प्रयत्न झाला. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.