महाराष्ट्रराजकारण

घर घेणाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; 31 डिसेंबरपर्यंत स्टॅम्प ड्युटीत कपात

राज्य सरकारने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाविकास आघाडी सरकारने 31 डिसेंबरपर्यंत घर खरदेवरील स्टॅम्प ड्युटीत मोठी कपात केली आहे सध्या घर खरेदीच्या प्रक्रियेत आकारण्यात येणारी स्टॅम्प ड्युटी 5 टक्क्यांवरुन 2 टक्क्यांवर येणार आहे. त्यामुळे घर खरदी करु इच्छिणाऱ्या सामान्य नागरिकांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आर्थिक व्यवहारांचा वेग प्रचंड मंदावला आहे. यामुळे ठाकरे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर अनेकांची पगार कपात झाली आहे. त्यामुळे याचा साहजिक फटका बांधकाम व्यवसायालाही बसला आहे. आर्थिक घडी विस्कटल्याने घर खरेदी करणाऱ्यांच्या संख्येतही मोठी घट झाली आहे. त्यामुळे एकूणच बांधकाम व्यवसायावर याचा विपरित परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे

कोरोनामध्ये हा एकप्रकारे दिलासा मिळणार आहे. सरकारच्या स्टॅम्प ड्युटी कमी करण्याच्या या निर्णयाने घर खरेदी करणाऱ्यांमध्ये काहीशी उत्साहाची लाट येऊन आर्थिक घडी पुन्हा बसू शकणार आहे. याच आशेवर सरकारकडून हा निर्णय घेतल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. राज्य सरकारने तात्पुरत्या स्वरुपात ही स्टॅम्प ड्युटी कमी केली आहे. यामुळे आता घर खरेदी करणे शक्य होणार आहे.