कृषीमहाराष्ट्र

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; कांद्यावर निर्यातबंदी घोषित

गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे भाव वाढतच आहेत. कांद्याने तीन हजार चा टप्पा ओलांडल्याने केंद्र सरकारने बाजार भावावर अंकुश लावण्यासाठी आज सायंकाळी कांद्यावरील निर्यात बंदीचा निर्णय आज वाणिज्य मंत्रालयाचे महासंचालक अमित यादव यांनी जाहीर केला. गेल्या पंधरा दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये 45 टक्क्याने वाढ झाल्याने केंद्र सरकार खडबडीत जागे होत कांदा निर्यात बंदीचा आज निर्णय जाहीर केला. शेतकऱ्यांनी मात्र या निर्णयामुळे नाराजी व्यक्त केली आहे.

संपूर्ण देशामध्ये कोरोणामुळे अर्थव्यवस्था डबघाईस आलेली असताना या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था संकटात सापडण्याची ही निर्माण झालेली आहे. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने १५ मार्च २०२० रोजी कांद्यावरील निर्यातबंदी उठवत पुन्हा निर्यात खुली केलेली होती.सहा महिन्यातच कांद्यावरील निर्यातबंदी लादल्याने शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.

शहरी ग्राहकाला खुश ठेवण्यासाठी सदरचा निर्णय घेतल्याची टीका शेतकऱ्यांकडून केली जात आहे. आज पासून लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले असून चीन आणि पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापती, लॉक डाउन केल्यानंतरही कोरोणा ग्रस्त रुग्णांची वाढत असलेली संख्या यासह अनेक मुद्द्यांवर संसदेमध्ये विरोधी पक्षाकडून घेरण्याच्या असलेल्या रणनीतीत कांद्याचा ही मुद्दा येऊ नये याकरिता केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदीची घोषणा केल्याचे बोलले जात आहे. मात्र या निर्णयामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.