महाराष्ट्रलक्षवेधी

हिंगोलीत पडला चक्क पाचशेच्या नोटांचा पाऊस, अनेक जण झाले मालामाल

सध्या कोरोनामुळे सर्वजण अडचणीत आहेत. अनेक व्यावसाय उद्योग बंद आहेत. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या अनेकांना हिंगोली जिल्ह्यात पाचशेच्या नोटांनी मालामाल केले आहे. जिंतूर-औंढा या राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास पाचशेच्या नोटांचा पाऊसच पडला. पैशांचा मालक कोण आहे हे मात्र कळू कशाचे शकले नाही.

औंढा नागनाथ येथून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील नांदेड-औरंगाबाद या राष्ट्रीय महामार्गावर औंढा-जिंतूर फाट्यापासून ते गोळेगावनजीक एका पेट्रोल पंपाजवळ वळण रस्त्यावर सकाळी अज्ञात वाहनातून पाचशे रुपयांच्या नोटा रोडवर पडल्या.

वारा असल्याने त्या एक किलोमीटर अंतरापर्यंत पसरल्या. रस्त्यावर पडलेल्या नोटा पाहून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांनी गाडी थांबवून त्या गोळा केल्या. ज्यांना आधी संधी मिळाली ते मालामाल झाले. एका लाभार्थ्यानेच दिलेल्या माहितीनुसार, चालक, प्रवासी असे ४0 ते ५0 जण नोटांचे लाभार्थी ठरले. या नोटा कधी पडल्या, कुणाच्या आहेत, किती आहेत याची कुणालाही माहिती नाही.पोलिसांमध्ये सुद्धा अजून कोणी तक्रार केली नाही. यामुळे पैसे कोणाचे होते हे समजले नाही. मात्र कोरोना काळात अनेकजण यामुळे मालामाल झाले.