Newslive मराठी – अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या तिच्या आगामी कलंक चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच एका मुलाखतीत तिला भारतीय पुराणकथांमधील आवडत्या पात्रांबद्दल विचारले.
तेव्हा ती म्हणाली, हनुमानाच्या कथा मला सर्वात जास्त आवडतात. तसेच हनुमानाच्या कथांकडे अनेक पैलूंनी पाहता येईल.
त्याच्या जीवनावर एकही चित्रपट बनलेला नाही. हनुमानाच्या जीवनावर चित्रपटांची मालिकाच बनू शकते, असंही ती म्हणाली.