महाराष्ट्रशैक्षणिक

अंतिम परीक्षेसाठी राज्यभर एकच पॅटर्न; ‘अशी’ होणार परीक्षा

शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. राज्यातील 13 अकृषिक विद्यापीठांशी संलग्नित साडेपाच हजार महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षासाठी सुमारे साडेसात लाख विद्यार्थी आहेत. कोरोना संसर्गाची स्थिती पहाता, या सर्वांची ऑफलाइन परीक्षा घेणे अशक्‍य असून दिर्घ प्रश्‍नांची उत्तरे सोडवून घेणे ऑनलाईनच्या दृष्टीने सोयीचे नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे ऑनलाईनची साधने आहेत, त्यांची ऑनलाइन तर ज्यांच्याकडे तशी साधने नाहीत, त्यांची ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय सद्यस्थितीत रास्त वाटत आहे.

दुसरीकडे चार सत्रात परीक्षा घेतल्या जाणार असल्याने प्रश्‍नत्रिकेचा राज्यभर एकच पॅटर्न राज्यभर राबविला जाणार असून बहुपर्यायी प्रश्‍नपत्रिका देण्याचे नियोजन असल्याचेही वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.

ऑफलाइन परीक्षेच्या दृष्टीने विद्यापीठांनी आता संलग्नित महाविद्यालयांकडील उपलब्ध संगणक, वर्गखोल्या, बेंच याची माहिती मागविली आहे. यामुळे आता महाविद्यालयांनी सुद्धा तयारी सुरू केली आहे. यातच आता अजून काय बदल होणार का हे पाहावे लागणार आहे.