कोरोनादेश-विदेशराजकारण

आत्मनिर्भरतेच्या दिशेकडे पाऊल; भारतानं सहा राष्ट्रांना पुरवल्या २३ लाख पीपीई किट

Newsliveमराठी – करोनानं भारतात शिरकाव केल्यानंतर पीपीई किटचा प्रचंड तुटवडा होता. सुरूवातीच्या काळात वैद्यकीय उपकरणांसाठी भारताला दुसऱ्या देशांवर निर्भर राहावं लागलं होत.

मात्र, या संकटाला संधी मानत भारतानं आत्मनिर्भर होण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. जुलैमध्ये निर्यात बंदी उठवल्यानंतर भारताने अमेरिकेसह अन्य पाच देशांना २३ लाख पीपीई किटचा पुरवठा केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

करोनासंबंधित वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीच्या दिशेनं भारत वाटचाल करत आहे. जुलैमध्ये भारताने अमेरिका, ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती तसेच सेनेगल आणि स्लोवानिया या देशांना २३ लाख पीपीई किटचा पुरवठा केला आहे. आरोग्य़ मंत्रालयाने शुक्रवारी ही माहिती दिली. जागतिक बाजारपेठेत पीपीई कीटच्या निर्यातीमुळे भारताला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.