महाराष्ट्रलक्षवेधी

महाराष्ट्रात गणपती विसर्जनात एकूण 16 जण बुडाले

सध्या कोरोना महामारीमुळे सर्व सण साधेपणाने साजरे केले जात आहेत. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात साधेपणाने गणेश विसर्जन करण्यात आलं. मात्र असं असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये गणपती विसर्जनासाठी गेलेले तरुण बुडाल्याच्या घटना घडल्या आहेत.

राज्यात आज एकूण 16 जण बुडाले असून यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तसंच 2 तरुणांचा शोध सुरू आहे. स्थानिकांनी 5 जणांपैकी 3 जणांना वाचवले 2 जणांचा अद्याप शोध सुरू आहे. हे पाचही युवक भुसावळ शहरातील शनिमंदिर वॉर्डमधील असल्याची माहिती मिळाली आहे. ZTS जवळील रेल्वे पुलाजवळ ही घटना घडली.

जळगाव जिल्ह्यातीलच चोपडा तालुक्यातल्या विरवाडे येथंही दुर्घटना घडली. गणपती विसर्जनासाठी गेलेल्या तीन तरुणांचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. गणपती विसर्जनावेळी जीव गमावलेल्या तरुणांमध्ये दोन सख्खे व एक चुलत अशा तीन भावांचा समावेश आहे. यामुळे या आंनदाच्या सणात मोठे दुःख कोसळले आहे.