महाराष्ट्र

सावकारीला कंटाळून एका महिलेची मंत्रालयासमोर आत्महत्या

Newslive मराठी- सावकारी कर्जाला कंटाळून एका महिलेने शुक्रवारी मंत्रालयाच्या गार्डन प्रवेशद्वाराजवळ अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच या महिलेला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

शारदा अरूण कांबळे ( वय ४५ ) लाल डोंगर चेंबूर येथे राहणाऱ्या या महिलेवर सावकारी कर्ज आहे, त्याचा वाद न्यायालयात सुरू असून या महिलेला मरीन ड्राईव्ह पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास मरीन ड्राईव्ह पोलीस करीत आहेत.