महाराष्ट्रराजकारण

आरेचे कारशेड आता कांजूरमार्गमध्ये; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर आता मेट्रोचं कारशेड थेट कांजुरमार्ग येथे हलवण्यात आलं आहे.

शासकीय जमिनीवर असून शून्य खर्च येणार आहे. आरेमधील 800 एकर परिसर हा आता जंगल म्हणून घोषित केला आहे. आरेचा परिसर जंगल म्हणून घोषित केल्यानंतर मेट्रो कारशेडचं काय होणार असा प्रश्न होता. पण आता हा मेट्रो कारशेड कांजुरमार्ग इथं उभारण्यात येणार आहे. कांजुरमार्गमधील जागा ही सरकारची आहे. त्यामुळे यासाठी कोणताही खर्च येणार नाही.

यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते की हातातलं वैभव सोडून जर आपण विकास साधत असू तर तो आम्हाला नको आहे. आम्ही आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली होती. आम्ही मेट्रोच्या विरोधात नाही मात्र वृक्षतोडीचा विरोधात आहोत.