खेळबारामतीमहाराष्ट्र

एसीसी फायटर्स ठरला बीपीएलचा पहिला मानकरी!

Newslive मराठी- (बारामती प्रतिनिधीः रणजीत कांबळे) बारामती शहरात प्रथमच आयपीएलच्या पार्श्वभूमीवर बारामती प्रमियर लीगचे (बीपीएल) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे 5 ते 8 फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले होते. आमराई बॉईज क्रीडा प्रतिष्ठानकडून या सुंदर आणि रंगतदार क्रिकेट सामने भरविण्यात आले होते.

या स्पर्धेची अंतिम लढत ही एसीसी फायटर्स आणि भापकर 007 टायगर्स यांच्या दरम्यान खेळविण्यात आला. यात एसीसी फायटर्स या संघाने सुंदर खेळाचे प्रदर्शन करत स्पर्धेतील डार्क हॉर्स समजणाऱ्या भापकर 007 टायगर्सवर मात करत या स्पर्धेच्या पहिल्या पर्वातील पहिला विजेत्याचा मान मिळविला. बीपीएलच्या पहिल्या पर्वाचा अंतिम सामन्याचा मानकरी हा एसीसीचा निलेश लोणकर ठरला, तर स्पर्धेतील मालिकावीर हा तुषार तावरे ठरला.

स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज सागर मोतीकर, उत्कृष्ट गोलंदाज तुषार झगडे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकाश काळे हे खेळाडू मानकरी ठरले. स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी आर्यन चॅलेंजर तर चौथ्या क्रमांकाचे मानकरी सुपर स्ट्रायकर, पाचव्या क्रमांकाचे मानकरी मित्रप्रेम पँथर्स, सहाव्या क्रमांकावर नवयुग ब्लास्टर तर सातव्या क्रमांकावर केजीएफ आणि आठव्या क्रमांकावर मेडद रॉकस्टार यांना समाधान मानावे लागले. स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचे 51 हजार रोपयांचे रोख बक्षीस देवीदास अण्णा गायकवाड यांनी दिले, तर दुसऱ्या क्रमांकाचे 31 हजार रुपये रोख गणेश भाई सोनवणे यांनी दिले. तिसऱ्या क्रमांकाचे 21 हजार रुपये रोक रोहन शेरकर यांनी दिले.

चौथ्या क्रमांकाचे बक्षीस 15000 रुपये अण्णा सातव, पाचव्या क्रमांकाचे बक्षीस 11000 रुपये बबलू देशमुख, सहाव्या क्रमांकाचे बक्षीस 10000 रुपये नितीन भाऊ शेलार आणि पिंटू भाऊ गायकवाड, सातव्या क्रमांकाचे बक्षीस 7000 रुपये अजिंक्य सरोदे आणि आठव्या क्रमांकाचे बक्षीस 5000 रुपये आबा खाडे यांच्याकडून देण्यात आले.

तसेच पाहिल्या ते आठव्या क्रमांकाचे चषक दुर्योधन भापकर यांच्याकडून देण्यात आले. यासह शिस्तबध्द संघ म्हणून विशाल भोसले यांच्याकडून ब्लूटूथ हेडसेट नवयुग ब्लास्टर या संघाला दिले गेले. स्पर्धेतील प्रत्येक एका रणासाठी दिले जाणारे दहा रुपयांचे बक्षीस अभिजीत कांबळे यांच्याकडून तर स्पर्धेतील प्रत्येक विकेटसाठी दिले जाणारे 50 रुपयांचे बक्षीस अमराई बॉईज क्रीडा प्रतिष्ठान यांच्याकडून दिले गेले.

ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व बक्षीस दात्यांचे तसेच ग्राउंडस्मन उत्तम धोत्रे, मंडप सौजन्य मत्रे, युट्युब सौजन्य किशोर लव्हे, सागर टिळेकर आणि बोराडे बंधू व्हीआरएस जिम फिटनेस सेंटर यांनी मदत केली. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अमराई बॉईज क्रीडा प्रतिष्ठानचे रविंद्र सोनवणे यांच्याकडून व्यक्त करण्यात आले. स्पर्धेचे यशस्वीपणे नियोजनासह पार पाडण्यासाठी मुख्य संयोजक म्हणून अभिजीत कांबळे, योगेश व्हटकर, रविंद्र उर्फ पप्पू सोनवणे, सुरज उर्फ पप्पू आहिवळे यांनी अतिशय कष्ट घेतले.

तसेच अमराई बॉईज क्रीडा प्रतिष्ठानचे सम्राट गायकवाड, शुभम चव्हाण, गणेश जाधव, इम्रान शेख, अभिजीत खरात, दयावान दामोदरे, सोहेल खान, सुरज विश्वकर्मा, सुजित बगाडे, अनिकेत कांबळे, भिमरत्न भोसले, आकाश काळे या सर्वांनी देखील अतिशय कष्ट घेऊन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली. स्पर्धेसाठी मार्गदर्शक म्हणून अभिजीत चव्हाण, निलेश आल्हाट, यशपाल भोसले, सम्राट गायकवाड, धीरज जाधव सर यांनी मार्गदर्शन पर काम केले.

स्पर्धेसाठी समालोचक म्हणून जगताप सर, थोरात सर आणि नहार शेठ यांनी काम पाहिले. सदरील स्पर्धाही अतिशय उत्साहात व आनंदात पार पाडली गेली. स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद पाहून आमराई बॉईज क्रीडा प्रतिष्ठानकडून लवकरच या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले.

बारामतीत पहिल्यांदाच आपीएलच्या पार्श्वभूमीवर बीपीएलचे आयोजन

पाकिस्तानचा फलंदाज फिक्सिंगच्या जाळ्यात

दिपाली धुमाळ यांना दिले विरोधी पक्षनेते पदाचे नियुक्तीपत्र

शिवजयंतीचे नियोजन करण्यासंदर्भात मनपाची बैठक संपन्न