महाराष्ट्रराजकारणलेख

मोदींच्या सभेवरून परतणार्‍या बंदोबस्ताच्या गाडीला अपघात; धनंजय मुंडे आले मदतीला धावून

Newslive मराठी- सिरसाळा, दि.17 (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळी येथील सभेचा बंदोबस्त आटोपून पोलिसांचे एक पथक पोलीस व्हॅनने बीडकडे परत जात असताना सिरसाळा परिसरात व्हॅन पलटी होवून अपघात घडला. या अपघातात चालक गंभीर जखमी असून 12 ते 15 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. त्याचवेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा ताफा परळीकडे येत होता. त्यांना अपघाताची माहिती कळताच तात्काळ स्वतः उतरून जावून जखमी पोलिस कर्मचार्‍यांना बाहेर काढून उपचारासाठी पाठवण्याची सोय केली.

विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे हे सध्या राज्यभर चर्चेतील नाव असून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज त्यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परळीत पाचारण केले होते. दरम्यान सभा संपल्यानंतर अतिरीक्त सुरक्षेसाठी मागवलेले पोलिस कर्मचारी, पोलिस मुख्यालय बीड कडे परत जात असताना त्यांच्या व्हॅनला सिरसाळा परिसरात चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होवून अपघात झाला. त्याचवेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा परळीच्या दिशेने येत होता. बाजूला अपघात झाल्याचे कळताच त्यांनी ताफा थांबवून स्वतः अपघातग्रस्त पोलिसांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.

धनंजय मुंडे हे त्यांची सामाजिक जाणीव व संवेदनशिलता यासाठी प्रसिध्द आहेत. आज निवडणूकीच्या धामधूमीत व सभेला जाण्यासाठी उशिर होत असतानाही त्यांनी थांबून अपघातग्रस्तांना मदत केली यातून पुन्हा एकदा मुंडे यांची संवेदनशिलता दिसून येते.

तर मोदींना आणायची वेळ आलीच नसती – परळीकरांच्या पंकजताईना कोपरखळ्या

धनंजय मुंडेंची कॉपी करणाऱ्या कॉपी ताई पंकजा मुंडे

मोदींची सभा म्हणजे डोक्याला ताप; उद्विग्न जनता त्रस्त

बातम्यांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi