Newslive मराठी– पुलवामा जिल्ह्यात झालेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान शहिद झाले.
दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बीबी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरपांगरा गावचे नितीन शिवाजी राठोड हेदेखील या हल्ल्यात शहीद झालेत. नितीन राठोड यांच्या पश्चात पत्नी वंदना राठोड, मुलगा जीवन, मुलगी जीविका, आई सावित्रीबाई राठोड, वडील शिवाजी राठोड, भाऊ प्रवीण आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

महाराष्ट्राचा दुसरा सुपुत्र संजय राजपूत दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले आहेत. संजय राजपूत हे बुलडाणा जिल्ह्याचे रहिवासी आहेत. संजय राजपूत यांचं कुटुंब हे बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर इथल्या लखानी प्लॉट इथं राहतं.

दरम्यान, गुरुवारी एकाच दिवशी महाराष्ट्रानं आपल्या तीन सुपुत्रांना गमावलंय. सांगली जिल्ह्यातील जवान राहुल कारंडे यांचा एका अपघातात मृत्यू झाल्याचं समजतंय. राहुल कारंडे कवठेमडंकाळ इथल्या विठुरायाची वाडी या गावचे रहिवासी होते. राहुल कारंडे ही पुलवामा हल्ल्यात शहीद झाल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट झालंय.

माझा दुसरा मुलगाही सैन्यात पाठवतो पण…
पंतप्रधानांची ग्वाही; शहिदांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही…