आंतरराष्ट्रीयखेळ

आचरेकर सरांनी खेळायला शिकवलं आणि जगायलाही- सचिन तेंडुलकर

Newslive मराठी-  आचरेकर सरांनी मला खेळायलाही शिकवलं आणि जगायलाही. त्यांचे आभार मानावे तितके कमी आहे. असे म्हणत सचिन भावुक झाला. जगाला सचिन तेंडुलकर सारखा महान फलंदाज देणारे गुरु रमाकांत आचरेकर सर यांचे बुधवारी ८७ व्या वर्षी निधन झाले. तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रविण आमरे, अजित आगरकर आणि चंद्रकांत पंडित आदी खेळाडू घडवणारे आचरेकरसर बऱ्याच काळापासून आजारीच होते.

आंतरराष्ट्रीय त्यांची ओळख ही तेंडुलकरचे गुरु अशीच होती. नुकतेच तेंडुलकर आणि कांबळी यांनी आचरेकर सरांचा आशीर्वाद घेत नव्या इनिंग्जची सुरुवात केली होती. तेंडुलकर आणि आचरेकर सर यांची ती भेट अखेरची ठरली.

आचरेकर सरांच्या निधनाने तेंडुलकर खूप भावूक झाला आहे. तो म्हणाला,”आचरेकर सरांचे माझ्या आयुष्यातील योगदान शब्दात सांगणे अवघड आहे. मी आज तुमच्यासमोर जो काही उभा आहे, त्याचा पाया आचरेकर सरांनी रचला आहे. मागील महिन्यातच मी त्यांची भेट घेतली होती. त्या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा दिल्या.’