मनोरंजन

अभिनेता अरमान कोहलीला अटक!

टिम Newslive मराठी: अभिनेता अरमान कोहलीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ४१ इम्पोर्टेड दारुच्या बाटल्या जवळ ठेवल्याचा आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. कायद्यानुसार एखादी व्यक्ती दारूच्या १२ बाटल्यांपेक्षा बाटल्या स्वत: जवळ ठेवू शकत नाही. तसेच प्रवासा दरम्यान दारुच्या फक्त २ दारुच्या बाटल्या जवळ ठेवू शकतो.

अरमान कोहली जवळ ४१ पेक्षा ही जास्त स्कॉचच्या बाटल्या आढळल्या आहेत. त्यामध्ये ३५ बाटल्या खासगी पार्टीमध्ये वापरण्यात आल्या होत्या, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई दारुबंदी अधिनियम १९४९च्या कलम ६३ (इ) अंतर्गत नियमांचे उल्लघन केल्यामुळे अरमानला ३ महिन्यांचा तुरुंगवास आणि दंडही आकारला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *