आंतरराष्ट्रीयमनोरंजन

अभिनेत्री साराचा हा स्वभाव; आवडला रोहित शेट्टीला

Newslive मराठी- सिम्बा चित्रपटात काम मिळवण्यासाठी अभिनेत्री सारा अली खानने हात जोडून विनंती केली होती. असे दिग्दर्शक रोहित शेट्टीने म्हटले कामासाठी तिने खूप संदेश दिले होते. अखेर मी तिला भेटायला बोलावले.

तेव्हा ती आई वडिल मोठे कलाकार असताना कोणालाही मध्यस्थी करायला न लावता स्व: हिमतीवर काम मागितले. बाॅडीगार्ड न घेता एकटीच आली.  यावर माझा विश्वासच बसत नव्हता. मला भेटायला आल्यावर अक्षरश: हात जोडून तिनं काम मागितलं.

तिचा तो सच्चपणा मला एवढा भावला की माझे डोळे पाणावले. सैफ अली खानची मुलगी असतानाही काम मिळवण्यासाठी ती करत असलेली धडपड मला खूप आवडली. तिला चित्रपटात काम द्या असं सांगायला मला ना सैफनं फोन केला ना अमृता सिंगनं. तिनं काम मिळवण्यासाठी स्वत: धडपड केली हे मला खूप जास्त आवडलं असं म्हणत रोहितनं तो किस्सा सांगितला.