महाराष्ट्रराजकारण

चंदीगड एअरपोर्टहून अभिनेत्री कंगना रणावत मुंबईकडे रवाना

सध्या कंगना रणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या टीका टिप्पणी सुरू आहे. अभिनेत्री कंगनाने देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने तिच्यावर चौफेर टीका होत आहे. यातच केंद्राकडून दिलेल्या वाय दर्जाच्या सुरक्षेसह अभिनेत्री कंगना रणावत आज चंदीगड एअरपोर्टहून मुंबईला येणार आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, चंढिगडहून मुंबईसाठी कंगना दुपारी १२.३० वाजता रवाना होईल. सध्या ती हिमाचल प्रदेशातील मंडी येथील तिच्या घरी आहे. मंगळवारी कंगना तिच्या मूळगावी पोहचली त्याठिकाणी तिच्या चाहत्यांनी घराबाहेर गर्दी केली होती. तिच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षाही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आली आहे.

आता मुंबईत आल्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार हे महत्त्वाच ठरणार आहे. शिवसैनिक हे तिला आवडणार की नाही हे समजेल. तसेच रामदास आठवले यांनी कंगनाची आम्ही काळजी घेऊ तिला संरक्षण देऊ असे म्हटले आहे. ती मुंबईत आल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते.