आंतरराष्ट्रीयदेश-विदेशलक्षवेधी

अभिनेत्री प्रियंका चोप्रा पाकिस्तानी युजर्सच्या निशाण्यावर

Newslive मराठी-  भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात केलेल्या हल्ल्यानंतर हवाई दलाचे कौतुक करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा पाकिस्तानी युजर्सच्या निशाण्यावर आली.

पाकिस्तानी युजर्सनी प्रियंकाला लक्ष्य करत एक ऑनलाईन मोहिम छेडली. प्रियंकाला युनिसेफच्या ‘गुडविल अ‍ॅम्बेसेडर’ पदावरून हटवा, अशी मागणी या मोहिमेद्वारे करण्यात येत आहे.

प्रियंकाचे भारतीय हवाई दलास चीअर करणारे ट्विट रिट्विट करत, पाकिस्तानी अभिनेत्री अरमीना खान हिने पीसीवर टीका केली आहे. ‘तुला युनिसेफची सदिच्छादूत मानायचे नाही का? सर्वांनी प्रियंकाच्या या ट्विटचे स्क्रीनशॉट्स घ्या आणि यानंतर ती कधी शांती व सद्भावनेबद्दल बोललीच तर तिचा दुटप्पीपणा उघडा पाडा,’ असे अरमीना खानने लिहिले आहे.

दरम्यान, अरमीना खानच्या या ट्विटनंंतर अनेक पाकिस्तानी युजर्सनी युनिसेफ व संयुक्त राष्ट्र संघाला टॅग करत, प्रियंकाला युनिसेफच्या सदिच्छादूत पदावरून हटविण्याची मागणी करत मोहिम छेडली आहे.

Newslive मराठी पेज लाईक करण्यासाठी लिंकवर क्लिक करा. newslivemarathi