बातमीमनोरंजन

गरजुंना मदत केल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंनी मानले अक्षय कुमारचे आभार!

Newslive मराठी- सध्या कोरोनामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अनेकांना मदतीची गरज आहे. अभिनेता अक्षय कुमार कलाविश्वाप्रमाणेच समाजकार्यातही सक्रियपणे सहभाग घेत असतो. अनेकवेळा तो मदत करत असतो. अनेक वेळा अडीअडचणीत सापडलेल्या नागरिकांना तो मदत करत असतो. सध्या देशावर करोनाचं सावट असल्यामुळे या काळातही तो गरजुंना आणि अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदत करत आहे. आता अक्षयने मुंबई पोलिसांमध्ये फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिवाइसचं वाटप केलं आहे.

विशेष म्हणजे त्याच्या या कार्याची दखल पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतली आहे. आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून अक्षयचे आभार मानले आहेत. गरजेच्यावेळी अक्षय कुमार हा समाजकार्याला धावून आला आहे.

या अगोदर अक्षय कुमारने नाशिक पोलिसांनंतर मुंबई पोलिसांमध्ये फिटनेस हेल्थ ट्रॅकिंग डिवाइसचं वाटप केलं. या डिवाइसमुळे पोलिसांच्या शरीराचं तापमान, ऑक्सिजनची क्षमता, हृदयाचे ठोके हे तपासता येणार आहे. त्यामुळे त्याचं हे कार्य पाहून आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत अक्षयचं कौतुक करत त्याचे आभार मानले आहेत. तसेच त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमारने आपल्या देशातील सशस्त्र दल, वेगवेगळ्या राज्यातील पोलीस दल यांना पाठिंबा दिला आहे. आपल्या करोना योद्धांची काळजी घेतल्यामुळे मनापासून तुमचे आभार. यावेळी आम्ही यातील काही डिवाइस बीएमसी कर्मचाऱ्यांना देण्याविषयीही चर्चा केली”, असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. या ट्विटची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या-

-रिया चक्रवर्तीचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

-सुशांत नैराश्यामध्ये जाणारा व्यक्ती नाही; अंकिता लोखंडेचा खुलासा

-सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला गंभीर इशारा