आंतरराष्ट्रीयलक्षवेधीव्यापार

भारतानंतर अमेरिकेतही टिकटॉकसह चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याची तयारी

Newslive मराठी-  काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव भारतानं टिकटॉकसह काही चिनी ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अमेरिकेनंही भारताच्या या निर्णयाचं समर्थनही केलं होतं.

तसंच त्यांनीदेखील असं पाऊल उचलणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांनंतर आता जपानदेखील टिकटॉकसह काही चिनी ॅपवर बंदी घालण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे.

जपानमध्ये चीन पब्लिशर्सकडून तयार करण्यात आलेल्या ॅपवर बंदी घालण्याचा लोकप्रतिनिधींचा विचार सुरू असल्याची माहिती एनएचके वर्ल्डनं आपल्या अहवालात दिली आहे.

तसंच भारत आणि अमेरिकेप्रमाणेच लोकप्रतिनिधींनी सुरक्षेबाबत चितांही व्यक्त केली आहे. याव्यतिरिक्त युझर्सचा सर्व स्थानिक डेटाही अशा ॅपद्वारे चीनच्या सरकारच्या हाती लागू शकतो असंही त्यांचं म्हणणं असल्याचं एनएचकेच्या अहवालात सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना होणार नाही; वैज्ञानिकांनी केला मोठा दावा

-देशातील कोरोनाबाधितांनी 15 लाखांचा टप्पा ओलांडला

-सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणी मायावतींनी ठाकरे सरकारला दिला गंभीर इशारा