महाराष्ट्रराजकारण

डॉक्टरांबद्दल वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, भाजपवर टीका करत म्हणाले..

मुंबई । ‘डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडर बरा’ या विधानामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत अडचणीत आले आहेत. भाजपने त्यांच्या विधानावर जोरदार टीका केली असून माफी मागण्याची मागणी केली आहे. अखेर संजय राऊत यांनी या प्रकरणावर खुलासा करत भाजपवर टीका केली. डॉक्टर मंडळी आपलीच आहेत. जेव्हा ते अडचणीत आलेत त्यावेळी मी व्यक्तीशा त्यांची मदत केली आहे.

डॉक्टरांच्या विरोधात जेव्हा आंदोलने केली त्यावेळी मीच मध्यस्तीची भूमिका केली आणि डॉक्टरांची बाजू घेतली होती. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही असे राऊत यांनी स्पष्ट केले. एका विशिष्ट राजकीय विचारांची लोकं मोहीम चालवत असतील तर योग्य नाही. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही. बोलण्याच्या ओघात माझ्याकडून कोटी झाली. गैरसमज कुणी करू नये.

नरेंद्र मोदी यांनी लंडनला जाऊन डॉक्टरांचा अपमान केला. आमचे डॉक्टर जास्त पैसे घेतात. त्यावर तिथल्या डॉक्टरांनी निषेध केला. मग मोदींचा निषेध का करत नाही? असा पलटवार राऊत यांनी भाजपवर केला. माझ्या मनात डॉक्टरांच्या सर्व सहकार्याविषयी सन्मान आहे. मी कम्पाउंडरचा सन्मान केला म्हणून एका पक्षाने मोठी भूमिका घेण्याची आवश्यकता नाही. या विषयातील राजकारण थांबवायला हवे’ असेही राऊत म्हणाले आहेत.