बारामतीमहाराष्ट्र

शेतीची पद्धत बदलली पाहिजे- शरद पवार

Newslive मराठी-  जगात होत असलेल्या बदलांबरोबर पारंपारिक शेतीची पद्धत बदलली पाहिजे. शेतीशिवाय अन्य क्षेत्रातूनही उत्पन्न मिळवता आले पाहिजे. असे मत माजी कृषीमंत्री राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पवार यांनी शारदानगर येथे व्यक्त केले.

शेतीच्या जागतिक दर्जाच्या स्टार्टअप्ससाठी निवडलेल्या ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी महाविद्यालयाच्या इनक्युबेशन व इनोव्हेशन सेंटरची पायाभरणी  इक्रिसॅटचे महासंचालक डॉ. पीटर कार्बेरी, टाटा ट्रस्टचे वरिष्ठ सल्लागार डॉ. बर्जिस तारापोरवाला व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे काम आता देशभरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरू लागले आहे. येथे देशाच्या कानाकोपऱ्यातून ज्ञान घेण्यासाठी शेतकरी येऊ लागले आहेत. कारण देशातील जास्तीत जास्त लोकसंख्या ही शेतीत काम करते. येथे चांगली शेती केली पाहिजेच.
शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री