आंतरराष्ट्रीयमनोरंजन

ऐश्वर्या-आराध्या कोरोनामुक्त; बिग बींना आनंदाश्रू झाले अनावर

Newslive मराठी- अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन तिची आठ वर्षांची मुलगी आराध्या यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. या दोघींनाही नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

आराध्या आणि ऐश्वर्याची करोना चाचणी निगेटिव्ह आली त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत आनंद व्यक्त केला आहे. सोबतच त्यांना अश्रू अनावर झाल्याचं म्हटलं आहे.

 

त्याचबरोबर,ऐश्वर्या आणि आराध्याची करोना चाचणी निगेटव्हि आली आहे. मात्र अजूनही बापलेक यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बिग बी अभिषेक यांना 11 जुलै रोजी करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

12 जुलै रोजी ऐश्वर्या आराध्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा या दोघींनी घरातच क्वारंटाईन करण्यात आलं होतं. मात्र एका आठवड्यानंतर दोघींनाही नानावटीमध्ये दाखल करण्यात आलं होतं.