बातमीमहाराष्ट्र

कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांना अजित दादांनी चांगलंच झापलं; जनाची नाही तर…

Newslive मराठी- पुण्यामध्ये कोरोनाचा कहर कमी होत नाही. यामुळे उद्धव ठाकरेंनी पुण्याचा दौरा केला. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विधानभवनात काल बैठक झाली.

यावेळी कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीच्या गोंधळावरून अजित पवारांनी अधिकाऱ्यांनाच झापलं. विरोधक पुण्यावरून सतत सरकारवर आणि अजित पवारांवर टीका करत आहेत. कोरोनाची खरी आकडेवारी बाहेर येत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष वारंवार सरकारवर करत आहे.

यातच काल झालेल्या पुण्यातील बैठकीत कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीच्या गोंधळावरून अजित पवार अधिकाऱ्यांवर बरसले. मी हे बोलणं योग्य नाही, मात्र जनाची नाहीतर.., अशा शब्दात मुख्यमंत्र्यासमोरच पवारांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. त्यामुळे कागदी घोडे नाचवणाऱ्या अधिकाऱ्यांची गोची झाली. या बैठकीला पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

काही अधिकाऱ्यांचे पवार यांनी कौतुकही केले. अजित पवार यांनी या बैठकीत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्या कामाचे कौतुक केलं. तर विभागीय विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांना जबाबदारीची जाणीवही करुन दिली.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अधिकाऱ्यांच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, अधिकाऱ्यांचं प्रेझेंटेशन चांगलं असतं, मात्र कृतीत ते कमी पडतात. या बैठकीला सर्व प्रमुख प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. मुंबईतील कोरोना परिस्थिती आता हातात येत आहे. मात्र पुण्यात कोरोनाचा आकडा वाढतच आहे. म्हणूनच विरोधक सतत सरकारवर टीका करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-आपल्याकडे लॉकडाऊन, अनलॉकचा ताळमेळच नाही- राज ठाकरे

-मराठा तरुणांना आर्थिक दुर्बल 10 टक्के आरक्षण नाही; सरकारी जीआरवर विनोद पाटील आक्रमक

-राज्यात सरकार स्थापनेबाबत चंद्रकांत पाटील यांनी केला नवा खुलासा