महाराष्ट्रराजकारण

पहाटे अजित पवारांचा पुण्यात चक्क मेट्रोमधून प्रवास

पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. अजित पवार यावर लक्ष देत आहेत. पुण्यात कोरोनाच्या संकटातही नागरीक कामासाठी बस, रेल्वेनं आणि मेट्रोने प्रवास करतात. या सर्व पार्श्वभूमिवर आज पहाटे 6 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यात आली आहे. धावत्या मेट्रोत अजित पवार यांनी संपूर्ण पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांचीही चर्चा केली आहे.

अजित पवार यांनी संत तुकाराम नगर ते पिंपरीपर्यंत प्रवास केला. मेट्रोच्या रस्त्यातील काही झाडं काढली जाणार आहेत, त्यांचं पुनररोपन कसं केलं जाणार याचीही माहिती त्यांनी यावेळी घेतली. याचा एक व्हिडओदेखील समोर आला आहे.

असं असलं तरी कोरोनाचा धोका काही कमी होताना दिसत नाही. पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे गरज पडल्यास पुण्यात पुन्हा जनता कर्फ्यू लागू करा अशा सूचना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या होत्या. त्यानंतर आता कोरोनाला रोखण्यासाठी पुणे महापालिका नव्या उपाय योजना करणार आहे. ही मेट्रो लवकरात लवकर लोकांच्या सेवेत रुजू होण्यासाठी अजून काही वर्षे जाणार आहेत.