महाराष्ट्रराजकारण

अजित पवारांचा एक फोन आणि काँग्रेस आमदारांचे उपोषण मागे!

महाविकास आघाडीत सध्या तणावाचे वातावरण आहे. विकास निधी वाटपात दुजाभाव होत असल्याचा आरोप करत आपल्याच सरकारविरोधात उपोषणाचा इशारा देणाऱ्या काँग्रेसच्या ११ आमदारांनी अखेर उपोषण मागे घेतले आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार कैलाश गोरंट्याल यांना फोन करून समजूत काढल्यावर उपोषण रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. अजित पवारांचा शब्द महत्वाचा ठरला आहे.

जालन्यात विकास निधीच्या वाटपावरुन काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल नाराज झाले होते. आधीच महाविकास आघाडीत आलबेल नसल्याच्या चर्चा रंगल्या असताना गोरंट्याल यांनीही उपोषणाचा इशारा दिला. त्यामुळे अजित पवार यांनी गोरंट्याल यांची समजूत काढली आहे. शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि अंबेकर यांना दिलेला निधी मार्च महिन्याच्या पूर्वीचा होता.

आपण उपोषण करु नये, असे अजित पवार यांनी गोरंट्याल यांना सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठीही गोरंट्याल अजित पवारांना घेऊन जाणार असल्याची चर्चा होती. सध्या तरी ही नाराजी संपली असली तरी भविष्यात काय होणार हे लवकरच समजेल.