महाराष्ट्रराजकारण

अजित पवारांना रस्त्यावर फिरु देणार नाही – संजय राऊत

Newslive मराठी- राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी भाजपला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शिवसेनेच्या संजय राऊतांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.

यावेळी राऊत म्हणाले, ‘अजित पवार रात्री आमच्यासोबत होते. पण आमच्या नजरेला नजर लावून बोलत नव्हते. त्यांचे हावभाव समजत होते. नंतर त्यांचा फोन बंद लागला. एका वकिलासोबत बसले असल्याचे समजले. पण सकाळी कळालं ते कोणत्या वकिलासोबत होते ते’.

राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यानंतर संतापलेल्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, ‘अजित पवारांनी शरद पवारांना दगा दिला.

महाराष्ट्राच्या नजरेला नजर भिडवून शपथ का घेतली नाही. अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला काळिमा फासला. त्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही’.

बातम्यांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/Newslivemarathi